Home » Blog » Blog » Ai च्या मदतीने Resume बनवा : उत्तम नोकरीसाठी १००% उपयोगी !

Ai च्या मदतीने Resume बनवा : उत्तम नोकरीसाठी १००% उपयोगी !

Ai च्या मदतीने Resume बनवा : उत्तम नोकरीसाठी १००% उपयोगी !
Spread the love

प्रस्तवाना

वाचकहो , तुम्हाला तर माहितीच आहे सध्या नोकरी म्हणजे एक स्पर्धाच झाली आहे आणि या स्पर्धात्मक युगात नोकरीचे महत्त्व सुद्धा अधिक आहे . आज नोकऱ्यांची मागणी अधिक असताना नोकरीचे प्रमाण मात्र अतिशय कमी आहे आणि अशातच Ai चा वापर करून तयार केलेला Resume तुम्हाला नोकरीमध्ये प्राधान्य मिळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. Resume ही प्रत्येक माणसाची नोकरीसाठी पहिली ओळख असते , जितका तुमचा resume ताकदीचा असेल तितकी जास्त शक्यता तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची असते . हजारो resume असणाऱ्या कागदांच्या गर्दीत तुमचा resume दिसून येण्यासाठी तुम्हाला Ai खूप उत्तम मदत करू शकते .

तुमचा CV तुमची शैक्षणिक पात्रता तर सांगतोच पण तुम्हीच या नोकरीसाठी का सर्वांमध्ये उत्तम आहात हे सुद्धा दर्शवत असतो आणि अनेक वेळा आपण पात्र असूनसुद्धा resume अधिक बोलका नसल्यामुळे , त्याची रचना नीट नसल्यामुळे तुमची निवड होत नाही पण आता तुमच्या Achievement ,  शैक्षणिक पात्रता , समोरच्याला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे अस सर्व ठळकपणे दर्शवणारा आणि सर्वसमावेशक Resume तुम्ही Ai च्या माध्यमातून सहज तयार करू शकणार आहात , ज्यामध्ये तुमच्या स्वतःच्या  नोकरीकडून अपेक्षा ते तुमच्याकडून नोकरीला काय अपेक्षा आहेत या सर्व गोष्टी समाविष्ट असतील आणि म्हणून हा लेख खास तुमच्यासाठी …

Ai resume तयार करण्याचे फायदे :

१) वेळेची बचत

Ai नी तयार केलेले reume हे आपल्या वेळेची बचत करतात आणि उत्तम निकाल सुद्धा देतात . ज्या व्यक्तीला वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी किंवा1 वेगवेगळ्या पदासाठी apply करायचे असेल त्याला मदत होते.

२) व्यवसायिक रचना /मांडणी

Ai tools आपला resume अतिशय योग्य आणि रचनाबद्ध करतात , नोकरीप्रमाणे त्याची पातळी वाढवतात आणि सोबतच गरजेचे शब्द , पात्रता या गोष्टींचा समावेश करतात जेणेकरून (ATS) मध्ये तुमचा resume बाद होणार नाही.

३) वयक्तिक मार्गदर्शक

 Ai हे तुमच्या resume मध्ये काय चूक आणि काय बरोबर आहे हे सांगू शकते तसेच कुठे आणि काय सुधारणा करता येईल हे देखील नमूद करते .

४) सातत्याने बदल

तुमच्या कलागुणांमध्ये , शैक्षणिक पात्रतेमध्ये किंवा एकूणच resume मध्ये काही बदल करायचा असल्यास ते बदल ai टूल Company Friendly तयार करून देते.

Resume तयार करण्यापूर्वी आत्मपरीक्षण –

१) स्वतःची बलस्थाने , कौशल्ये आणि गुणवत्ता जाणून घ्या.

२) तुम्हाला कोणती नोकरी किंवा कोणते पद हवे आहे ते ध्यानात ठेवा.

३) संबंधित पदासाठी तुमचा resume कमी जास्त करा.

४) तुमच्या विशिष्ट कौशल्यांचा वापर करून आत्मविश्वास निर्माण करा.

Ai resume तयार करण्यासाठी गरजेच्या गोष्टी –

१) स्वतःची माहिती – स्वतःबद्दल , तुमच्या नावाशिवाय तुम्हाला ओळखू शकेल अशी माहिती एकत्र करा .

२) शिक्षण – तुमची शैक्षणिक पात्रता , शैक्षणिक यश , पदवी , पदविका , डिप्लोमा , संबंधित प्रमाणपत्रे इत्यादी

३) कामाचा अनुभव – पूर्वीच्या कामाचा अनुभव , त्यातील यश , प्राविण्य , प्रमाणपत्र , जबाबदारी नमूद करा.

४) कौशल्ये –  तुमच्या hard आणि soft skills ला प्राधान्य द्या. भाषा , बलस्थाने , तांत्रिक ज्ञान ह्यावर भर द्या.

५) प्राविण्य – तुमच्या यशाचा लेखाजोखा तयार ठेवा

६) पोर्टफोलिओ – तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचे नमुने , प्रकल्प , प्रकाशने गोळा करून जर ती तुमच्या कामाशी संबंधित असतील तर resume ला जोडून ठेवा.

आता घरबसल्या कमवा 50-60 हजार रुपये दर महिना फक्त Ai च्या माध्यमातून !

Ai resume तयार करण्यासाठी उत्तम tools :

१) Kickresume

हे टूल तुम्हाला reume assistant देते जे तुम्हाला मार्गदर्शन आणि तुमचा resume अधिक उत्तम तयार करू शकते .

२) Zety Resume Builder

हे एक ऑनलाइन resume builder टूल आहे जे एक व्यावसायिक resume तयार करते आणि सोबतच तुम्हाला उत्तम templates सुद्धा देते

३) Visual CV

हे टूल तुम्हाला माहितीसाठी मार्गदर्शन करेल सोबतच मांडणीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल.

४) ResyMatch

हे टूल (ATS) friendly आहे जे तुमचा resume ATS ला हवा तसा तयार करू शकते.

५) Jobscan

हे टूल तुम्हाला तुमचा resume संबंधित कामासाठी किती योग्य आहे ? पात्र आहे का ? त्यासाठी काय करावं लागेल ह्या सर्व गोष्टी नमूद करते.

६) Rezi

हे सुद्धा एक ATS friendly टूल आहे जे keywords वर काम करते .

निष्कर्ष : –

सध्याच्या या आधुनिक युगात Artificial intelligence चा वापर करून आपण अनेक गोष्टी सहज आणि परिणामकारक करू शकतो . अशातच नोकरी मिळवण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीत तुम्ही तुमचा Resume सुद्धा नोकरीसाठी अतिशय समर्पक आणि कामासाठी आवश्यक असा करू शकतात.

आता वेळ आली आहे की एक उत्तम resume तयार करून उत्तम नोकरी मिळवायची . भविष्याकडे पाहिलं तर ध्यानात येईल की पुढचं युग हे Ai च असेल त्यामुळे त्याचा वापर करून आपण स्वतःला विकसित करायला हवे . नोकरी शोधणे इथपासून ते नोकरी मिळणे इथपर्यंत सर्वच गोष्टीत Ai महत्वाची भूमिका बजावू शकते.

त्यामुळे आता तुम्ही या संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे Ai चा वापर करून एक उत्तम resume लिखाणाचा प्रवास तुम्ही सुरू करू शकतात ; ज्यामुळे तुमची पात्रता ही सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक होईल. Ai च्या मदतीने तुम्ही तयार केलेला हा Super Resume ही तुमच्या यशाची पहिली पायरी ठरू शकते, आणि ही त्याचीच सुरुवात आहे . तुमच्या Ai निर्मित super resume च्या माध्यमातून नोकरी मिळण्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा !


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top